कांदा बी, रोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी शोधले जुगाड, वेळेसह वाचेल पैसाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers find solutions to save onion seeds

पावसाळ्यात टाकलेल्या कांदारोपांची नासाडी झाली. परिणामी, लागवडीसाठी कांदारोपे नसल्याने पुन्हा रोपे टाकून लागवडीसाठी पैसा आणि वेळ लागणार आहे.

कांदा बी, रोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी शोधले जुगाड, वेळेसह वाचेल पैसाही

श्रीरामपूर ः यंदा परतीच्या पावसामुळे सोयाबीन, कापसासह कांदारोपांचे मोठे नुकसान झाले. कांदारोपांची नासाडी झाल्याने, पुन्हा रोपे टाकून लागवडीऐवजी थेट कांदापेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा प्रथमच कांदापेरणी वाढल्याने तालुक्‍यातील कांद्याचे क्षेत्र वाढणार आहे.

मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने रब्बी हंगामाला उशीर झाला. सध्या कांदापेरणीची लगबग सुरू आहे.

हेही वाचा - बच्चू कडू का निघालेत भाजपमध्ये

प्रारंभी महागड्या दराने घेतलेले कांदाबियाणे सततच्या पावसामुळे खराब झालं. शेतात साचलेले पाणी, ढगाळ हवामानामुळे कांदारोपे खराब झाली. आता कमी खर्चात कांदापेरणीसाठी यंत्राची मागणी वाढली आहे.

कांदालागवड करण्याऐवजी थेट बियाणे पेरणीचा कल वाढला आहे. आतापर्यंत तालुक्‍यात 225 हेक्‍टरवर कांदापेरणी झाली. त्यात आणखी कांदालागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याची शक्‍यता कृषिविभागाने वर्तविली आहे.

पावसाळ्यात टाकलेल्या कांदारोपांची नासाडी झाली. परिणामी, लागवडीसाठी कांदारोपे नसल्याने पुन्हा रोपे टाकून लागवडीसाठी पैसा आणि वेळ लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट कांदापेरणीला पसंती दिली.

पेरणीमुळे खर्चासह वेळ, मशागत कमी लागणार आहे. त्यामुळे कांदापेरणी फायद्याची ठरणार असल्याचे कांदाउत्पादकांनी सांगितले. कांदालागवडीच्या खर्चात बचत होऊन पेरणीमुळे वेळही वाचणार आहे. पेरणी यंत्राद्वारे वाफे पाडणे सोपे झाले आहेत. गोदावरी नदीपट्ट्यासह प्रवरा नदी परिसरातील तालुक्‍यातील शेकडो हेक्‍टरवर कांदापेरणी सुरू आहे. 

थेट कांदा बियाणे पेरणी पध्दतीमध्ये कांदा लागवडीचा एकरी नऊ हजार रुपयांच्या खर्चाची बचत होते. तसेच कांदा उत्पादन कालावधी घटल्याने उत्पादन लवकर होते. २० दिवस ते एक महिना कांद्याचे पिक लवकर काढणीस येते. शेतमजूरी महागल्याने मजूर मिळत नाही. पेरणी यंत्रामुळे लागवडीसाठी लागणारे मजूर शोधण्याचा ताण वाचतो.  

कांदा उत्पादक शेतकरी - सागर ज्ञानेश्वर कदम (गोंडेगाव, ता.श्रीरामपूर)

loading image
go to top