esakal | शेतकऱ्यांना नुकसानीचे चौदा कोटी एकवीस लाख मिळाले अनुदान
sakal

बोलून बातमी शोधा

The farmers have received a grant of Rs. 14 crore 21 lakh five thousand

तालुक्‍यात या वर्षी चांगला पाऊस झाला. अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्र्यांनी पाहणी दौरा केला. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांना नुकसानीचे चौदा कोटी एकवीस लाख मिळाले अनुदान

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्‍यातील टाकळीमानूर व कोरडगावसह मिरी मंडळातील चौदा गावे, अशा वीस हजार 819 शेतकऱ्यांना नुकसानीचे चौदा कोटी एकवीस लाख पाच हजार रुपये अनुदान मिळाले. उर्वरित साडेतीन महसूल मंडळांतील 38 हजार शेतकऱ्यांना अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा एक रुपयाही मिळालेला नाही. नुकसानीचे पैसे द्यावेत, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांतर्फे देण्यात आला आहे.

हे ही वाचा : पारनेरच्या 114 सरपंचपदांची आरक्षण सोडत येत्या सोमवारी व मंगळवारी

तालुक्‍यात या वर्षी चांगला पाऊस झाला. अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्र्यांनी पाहणी दौरा केला. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असल्याचे सांगितले. कोरडगाव व टाकळीमानूर मंडळातील लोकांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत दिली. तालुक्‍यातील चौदा गावांतील शेतकऱ्यांना मदत मिळाली. मिरी मंडळातील राहिलेली गावे, करंजी, पाथर्डी, माणिकदौंडी मंडळातील 38 हजार शेतकऱ्यांना सरकारचा एक रुपयाही अनुदान मिळाले नाही. आम्ही पंचनामे करून अहवाल पाठविले आहेत. पैसे मिळावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. पैसे आल्यानंतर अनुदान देऊ, असे महसूलचे अधिकारी सांगतात. 

हे ही वाचा : कोणीच मागेना शेततळे ! नेवाशात अर्ज आले साडेपाच हजार ; शेततळी झाली 827 
 
सरकारने जाहीर केल्याप्रमाणे पीक नुकसानीचे अनुदान द्यावे. अकोला व परिसरातील काही शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम अजूनही मिळालेली नाही. पाथर्डीच्या सेंट्रल बॅंकेत खाते असलेल्या अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. सामाईक खाते असलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळावी. 
- मनीषा ढाकणे, महिला शेतकरी, अकोला, पाथर्डी 

एकवीस हजार शेतकऱ्यांसाठी सव्वाचौदा कोटी रुपये अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यांवर वर्ग केली आहे. आणखी पाच कोटी देण्याची मागणी आहे. ती आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे मागितली आहे. साडेतीन मंडळांतील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीचे अनुदान अद्याप आलेले नाही. अनुदान आल्यानंतर वाटप करू. 
- श्‍याम वाडकर, तहसीलदार, पाथर्डी

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image