पारनेरच्या 114 सरपंचपदांची आरक्षण सोडत येत्या सोमवारी व मंगळवारी

मार्तंड बुचुडे
Thursday, 10 December 2020

तालुक्‍यात 114 ग्रामपंचायती आहेत. त्यांपैकी 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यांच्यासह सर्वच ठिकाणचे सरपंचपदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्‍चित करण्यात येणार आहे. ही सोडत वरील दोन दिवस तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे. 

पारनेर (अहमदनगर) :  तालुक्‍यातील 114 पैकी 88 ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या आहेत. तेथे प्रशासकांची नियुक्तीही करण्यात आली आहे. लवकरच तेथे निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील सर्वच 114 ठिकाणच्या सरपंचपदांसाठी येत्या सोमवारी व मंगळवारी (ता. 14 व 15) सोडत काढण्यात येणार आहे. 

हे ही वाचा : कोणीच मागेना शेततळे ! नेवाशात अर्ज आले साडेपाच हजार ; शेततळी झाली 827 

याबाबत माहिती अशी, तालुक्‍यात 114 ग्रामपंचायती आहेत. त्यांपैकी 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यांच्यासह सर्वच ठिकाणचे सरपंचपदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्‍चित करण्यात येणार आहे. ही सोडत वरील दोन दिवस तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे. 

अनेक इच्छुकांनी यापूर्वीच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र, गावाच्या राजकारणात सदस्यपदाला फारशी किंमत नसल्याने, सरपंचपदाच्या आरक्षणाकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. त्यात आता गावपातळीवर निधीही मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने अनेक विकासकामे करता येतात. त्यासाठी अनेकांनी सरपंच होण्याची तयारी सुरू केली असून, प्रत्येक गावात अटीतटीची लढत राहणार आहे. सरपंचपदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. 

ग्रामपंचायतींचे आरक्षण असे

अनुसूचित जाती- 6 जागा (3 महिला, 3 पुरुष), अनुसूचित जमाती- 6 (3 महिला, 3 पुरुष), ओबीसी (इतर मागास प्रवर्ग)- 31 (महिला 16, पुरुष 15), 
खुला प्रवर्ग- 71 जागा (महिला 36, पुरुष 35)

संपादन - सुस्मिता  वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are 114 gram panchayats in Parner taluka