Farmer Memorandum to Amit Shah: आर्थिक फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं पाऊल, गृहमंत्री अमित शहांना देणार निवेदन; शंभर कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याचा आरोप

Shrigonda Farmers Seek Justice from Amit Shah in Fraud Case: शेतकऱ्यांची आर्थिक फसवणुकीविरोधात भूमिका ठाम; अमित शहांना निवेदन देणार.
Amid allegations of a ₹100 crore investment fraud, farmers plan to meet Home Minister Amit Shah to submit a memorandum seeking justice.
Amid allegations of a ₹100 crore investment fraud, farmers plan to meet Home Minister Amit Shah to submit a memorandum seeking justice. sakal
Updated on

Protest by Farmers Over Massive Investment Fraud: आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना "उच्च परतावा" देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आर्थिक संस्थांच्या गुन्ह्यांनी गंभीर वळण घेतले आहे. श्रीगोंदा येथून सुरुवात झालेल्या या आंदोलनाचा केंद्रबिंदू आता दिल्लीकडे वळला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे थेट निवेदन सादर करण्यात येणार आहे. फसवणूक झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी गुंतवलेले पैसे परत मिळावेत आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी या निवेदनातून होणार आहे.

राजेंद्र आबा म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा येथे तुळशीदास मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीस राज्यभरातून आणि इतर राज्यांतून देखील फसवणूक झालेल्या सुमारे ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी हजेरी लावली. अनेकांनी कर्ज काढून पैसे गुंतवले होते. पहिल्या टप्प्यातील ४५० व आजच्या २५० अशा जवळपास ७०० शेतकऱ्यांनी अंदाजे ₹१०० कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. बैठकीस माजी पोलीस उपायुक्त कांतीलाल कोथिंबीरे, माजी संचालक अंबादास दरेकर, उद्योजक सुदाम कोथिंबीरे, मुकुंद सोनटक्के, अ‍ॅड. साके, अरुण जगताप यांची उपस्थिती होती.

फसवणूक करणाऱ्या कंपन्या आणि व्यक्ती

कंपन्या: ट्रे़डेज फायनान्शिअल सर्व्हिसेस, झेस्ट एएमसी लिमिटेड, इन्फिनिट बीकन, सिस्पे ट्रेडेझ व्हेंचर प्रा. लि., IF Global

संचालक: अगस्त मिश्रा, राहुल काळोखे, नवनाथ आवताडे, सचिन खडतरे, प्रसाद देशमुख, चेतन धार, ययाती मिश्रा, गौरव सुकदेव

या कंपन्यांनी मासिक १०% परताव्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे गोळा केले. एप्रिल २०२५ पासून परतावा थांबवला आणि कोणतीही परवानगी न घेता गुंतवणूक USDT (क्रिप्टो) मध्ये रूपांतरित केली. त्यानंतर गुंतवणूकदारांना जबरदस्तीने "USDT मध्ये पैसे परत मिळतील" अशा संमतीपत्रांवर सही करण्यास भाग पाडले जात आहे. हे सर्व प्रकार मोठ्या ऑनलाईन स्कीमद्वारे आणि Zoom मीटिंगच्या माध्यमातून चालू आहेत.

राजकीय आणि पोलिस संरक्षणाचा आरोप

काही वृत्तपत्रांच्या माहितीनुसार, या फसवणूक प्रकरणात काही पोलिस अधिकाऱ्यांचेही पैसे अडकले असल्याने गुन्हेगारांना संरक्षण दिले जात आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वरून चिंता व्यक्त करत केंद्र सरकारकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

ईमेल तक्रारी व कायदेशीर मागण्या

या फसवणुकीसंबंधी तपशीलवार निवेदन ED, गृह मंत्रालय, महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई पोलीस आयुक्त अशा संबंधित यंत्रणांना पाठवण्यात आले आहे. यामध्ये सर्व आरोपींचा शोध घेणे, त्यांचे देश सोडून जाणे थांबवणे, मालमत्ता गोठवणे आणि तत्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com