
श्रीगोंदे : दुचाकी व पिकअपच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील दोन तरुण ठार झाले. रविवारी रात्री अकराच्या सुमारास अहिल्यानगर-दौंड महामार्गावर कोळगाव शिवारात हा अपघात झाला. आदित्य संदीप नलगे (वय २०) व किरण मोहन लगड (वय २७, दोघे रा.कोळगाव, ता. श्रीगोंदे) अशी मयत तरुणांची नावे आहेत.