

Car wreckage seen deep inside the gorge after a fatal accident at Mhauli Ghat.
sakal
संगमनेर: तालुक्यातून जाणाऱ्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात बुधवारी (ता. १७) पहाटे भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. कारचा चक्काचूर झाला.