

Scene of the fatal Sonai-Rahuri road accident where a father and daughter lost their lives.
Sakal
राहुरी : सोनई-राहुरी रस्त्यावरील वंजारवाडी बसस्थानक चौकात आज (सोमवारी) दुपारी ३ वाजता एका भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील ब्राह्मणी येथील वडील व मुलगी जागीच ठार झाले. त्याच दुचाकीवरील आई व मुलगा सुदैवाने बचावले.