पती-पत्नीमधील भांडणात अनेकदा मुलांना त्रास सहन करावा लागतो. अहिल्यानगरमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. जिथे एका पुरूषाचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले. त्यानंतर त्याने प्रथम आपल्या चारही मुलांना विहिरीत टाकून मारले. त्यानंतर त्याने स्वतः विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. मृत मुलांमध्ये तीन मुली आणि एक मुलगा होता, ज्यांचे वय फक्त ६ ते ९ वर्षे होते.एकाच वेळी पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.