कोरोनाशी लढणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांबद्दल कौतुकाचे चार शब्द तरी काढा...नगराध्यक्ष पोटेंची भावना

संजय आ. काटे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

जनजागृती केली आहे. कोरोना रुग्ण निघणारे ठिकाणे बंद करण्यासाठी धावपळ सुरु असते. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचण्या करण्यासाठी त्यांना घेवून जातानाही कर्मचारी अडचणीत असतात मात्र काम प्रामाणिक करतात. 

श्रीगोंदे : नगरपालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत आहे. पालिका कर्मचारी व सगळेच नगरसेवक एकत्रीत समन्वय ठेवून काम करीत आहेत.

आरोग्य कर्मचारी तर रोज शहरातील स्वच्छता करताना कोरोनाशी जवळीकच करतात. मात्र, पालिका कर्मचाऱ्यांविषयी कुठे कौतुकाचे शब्दही निघत नसल्याची खंत व्यक्त करीत नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांनी, त्यांना कोरोना योध्दे म्हणून कुणी पुरस्कार नाही दिले तरी हरकत नाही पण जीव धोक्‍यात घालून काम होत असल्याचे कौतुकाचे चार शब्द तरी बोलून दाखवा अशी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा - मन फौजदार व्हावानु छ

शहरातील कोरोनाची साखळी लवकरच तुटेल असा आशावाद व्यक्त करीत पोटे म्हणाल्या, पालिका प्रशासन व पदाधिकारी कोरोना बत कुठेही कमी पडलेले नाहीत. तीन ते चारवेळा शहरात फवारण्या व फॉगिंग केले आहे.

जनजागृती केली आहे. कोरोना रुग्ण निघणारे ठिकाणे बंद करण्यासाठी धावपळ सुरु असते. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचण्या करण्यासाठी त्यांना घेवून जातानाही कर्मचारी अडचणीत असतात मात्र काम प्रामाणिक करतात. 

पालिका आरोग्य कर्मचारी तर जीव धोक्‍यात घालून रोज कोरोनाला जवळ करीत असल्याचे सांगत पोटे म्हणाल्या, आरोग्य विभागात 35 महिला व 26 पुरुष कर्मचारी आहेत. हे रोज शहरातील स्वच्छता करतात. तेही माणसेच आहेत हे आपण विसरुन गेलो आहोत. त्यांना कुठल्या पुरस्काराची गरजही नाही मात्र किमान चार कौतुकाचे शब्द जबाबदार व्यक्तींनी बोलताना त्यांचे काम चांगले सुरु असल्याचे तोंडी प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे.

दुर्देवाने काहींचा थाटात गौरव झाला असताना यांना मात्र कुणीही विचारत नसल्याचे वास्तव आहे. पालिका मात्र त्यांना वाऱ्यावर सोडणार नसून आरोग्य विभागासह सर्वच कर्मचारी व अधिकाऱ्यांचा काही दिवसात कौतुक सोहळा करणार आहोत. 

पालिकेचे मुख्याधिकारी शरद देवरे व सगळेच नगरसेवक कोरोनाच्या बाबतीत गंभीर आहेत. त्यांच्या प्रभागात सर्वच पदाधिकारी लक्ष ठेवून आहेत. या कामात काही पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. माझ्यासह इतर महिला पदाधिकारी घरात बसून नाहीत. आम्ही आमच्या पातळीवर यंत्रणेत सक्रीय आहोत.

पालिकेने पथके नेमली असून त्यांना कामे विभागून दिली आहेत. बाहेरगाहून आलेल्या व्यक्तीची माहिती यंत्रणेला कळवून संबधीतांना क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे पालिका कोरोनाबाबतीत कुठेही कमी पडत नाही मात्र त्या कामातील वास्तव समोर आणले जात नाही ही खंत असल्याचे पोटे म्हणाल्या. 

पोटे म्हणाल्या, रस्त्यांवर मास्क न लावता फिरणाऱ्यांना थांबवून त्यांना शिस्तीसाठी दंडात्मक कारवाई सुरु आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरुन तेथे काम करणारे कर्मचारीही धाडस दाखवित आहेत. पथकांनी सुमारे चार लाखांचा असा दंड वसुल केला आहे. तालुक्‍यातील कोरोनाच्या चांगल्या कामात पालिका व कर्मचाऱ्यांचेही कुठेतरी नाव घ्यावे, अशी सामान्य अपेक्षा कर्मचाऱ्यांची आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Feelings of Mayor Shubhangi Pote