Ganesh Festival २०२५:'गणरायाच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज'; शहरात दोनशेहून अधिक मंडळे; घरोघरी मंगलमय वातावरण, मोठा पोलिस बंदोबस्त

Festive Spirit in Nagar : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत लगबग सुरू आहे. गणेश मूर्ती, सजावटीचे साहित्य, रोषणाई, फुलांचे हार व पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. त्यामुळे बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण झाले आहे.
Ganesh Festival 2025
Ganesh Festival 2025esakal
Updated on

अहिल्यानगर: लाडक्या गणरायांचे बुधवारी (ता. २७) घरोघरी आगमन होणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी नगरकरांची गेल्या आठ दिवसांपासून लगबग सुरू आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्ते, वसाहती आणि गणेश मंडप सजावटीने उजळून निघाले आहेत. मंडप उभारण्यासाठी २३४ मंडळांनी महानगरपालिकेकडे अर्ज केले असून, त्यापैकी १४० मंडळांना परवानगी देण्यात आलेली आहे. दरम्यान, गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी तीन हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com