
शासनानेच नेमलेल्या आकृतिबंध समितीने सुचविलेल्या सूचनांच्या पूर्ण पणे विरोधात हा शासननिर्णय आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.
नेवासे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याचा शासनाचा निर्णय अन्यायकारक आहे. शाळांमध्ये शिपाईपद कंत्राटी करण्याचा निर्णय रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नेवासे तालुका माध्यमिक शिक्षकेतर संघाने दिला आहे.
तसे निवेदन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना देण्यात आले. शिपाई भरती कंत्राटी पद्धतीने करण्याबाबत शासन आदेशाची होळी करण्यात आली.
हेही वाचा - एका ओट्याने लावली कर्डिले-तनपुरे गटात भांडण
निवेदनात म्हटले आहे, की राज्यातील मान्यताप्राप्त खासगी, अंशतः, पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय अन्यायकारक आहे.
शासनानेच नेमलेल्या आकृतिबंध समितीने सुचविलेल्या सूचनांच्या पूर्ण पणे विरोधात हा शासननिर्णय आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.
संघटनेचे किशोर मुथा, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, दिगंबर वाळुंजकर, रमेश कुलकर्णी, उपाध्यक्ष भागवत सोनवणे, कपिल कुटे, संजय शेवाळे, संजय बिन्नर, राजेंद्र केकाण, अमोल गोरे, अशोक राजगिरे, रमेश गरुटे, प्रशांत सारंगधर आदी उपस्थित होते.