भास्करराव पेरे पाटलांविरूद्ध जामखेडमध्ये गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Filed a case against Bhaskarrao Pere Patil in Jamkhed
Filed a case against Bhaskarrao Pere Patil in Jamkhed

जामखेड : आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या विरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये मुलीचा पराभव झाला आहे. त्या नैराश्यातून पेरे पाटील यांचा संयम ढळला. हा गुन्हा दाखल झाल्याने ग्रामपंचायत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पेरे पाटील सरपंच असताना त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे त्यांना डोक्यावर घेतले होते. विविध माध्यमांतील त्यांच्या भाषणाच्या क्लिप फिरवून त्यांचे कौतुक होत होते. महाराष्ट्राचा सरपंच असा बहुमानही लोकांनी दिला होता. परंतु या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या मुलीला तेथील लोकांनी डावलले. या पराभवामुळे संपूर्ण महाराष्ट्र भयचकीत झाला होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनीही खेद व्यक्त केला होता.

पेरे पाटील यांचा (ता. 31 जानेवारी) मोहा (जामखेड) ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहात येथील एका कार्यक्रमात भाषणात त्यांनी पत्रकारांना (सकाळ माध्यम नव्हे) हलकट, हरामखोर अशा शिव्या देत अपमानित केले होते. 

या घटनेमुळे जामखेडमधील पत्रकार व्यथित झाले होते. या घटनेचा सर्व पत्रकारांनी एकत्र येत जाहीर निषेध केला होता. त्याबाबत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मुलीच्या पराभवामुळे पेरे पाटील यांना नैराश्य आले. त्यातून त्यांनी माध्यम प्रतिनिधींना शिवीगाळ केली, असे पत्रकारांचे म्हणणे आहे.

गृह राज्य मंत्र्यांचा आदेश

ता. 4 फेब्रुवारी रोजी गृह राज्य मंत्री शंभूराज देसाई हे जामखेडमधील पोलीस वसाहतीच्या भूमिपूजन प्रसंगी आले आसताना त्यांनाही निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गृह राज्य मंत्री देसाई यांनी पोलीस अधीक्षकांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 

काल पत्रकार अशोक निमोणकर यांच्या तक्रारीवरून जामखेड पोलिसांनी भास्करराव पेरे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com