ग्रामपंचायतीचा कर्मचारी जखमी झाला, मदतीला आले सगळे गावच धावून

सनी सोनावळे
Sunday, 6 September 2020

मागील आठवडय़ात त्यांचा दुचाकीवरून अपघात झाला त्यात ते गंभीर जखमी झाले सोशल नेटवर्किंग साईटवर याची माहीती गावातील तरूणांनी टाकल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यापासून थेट आर्थिक मदतीसाठी देखील आवाहन करण्यात आले अवघ्या काही तासांत आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला.

टाकळी ढोकेश्वर : कान्हूर पठार (ता.पारनेर) येथील ग्रामपंचायत कर्मचारी शशिकांत साळवे यांचा दुचाकीवरून अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. गावातील ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करून उपचार केले. आर्थिक मदत म्हणून ५१ हजार रुपयांचा धनादेशदेखील दिला.

या बाबत माहिती अशी की, शशिकांत साळवे हे कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून लाॅकडाऊन काळात ज्या काही उपाययोजना गावात राबविण्यात येत होत्या त्यामध्ये महत्वाची भुमिका साळवे हे बजावत आहे.

हेही वाचा - कोरोना लागला धर्माच्या मागे, दहावे अॉनलाईन

लोकांना चौकात उभे राहण्यापासुन मज्जाव करणे,बाहेर फिरताना लोकांनी मास्क चा वापर करण्यासाठी प्रसंगी वाद घालून त्यांना ते वापरण्यासाठी सक्ती करण्यासाठी आग्रह धरणे,वेळेत दुकाने बंद करणे यासंह अन्य बाबी साठी ते पुढाकार घेतात त्यांना या कामाबाबत अनेक संस्थानी कोरोना योद्धा पुरस्कारानेदेखील सन्मानित केले आहे.

मागील आठवडय़ात त्यांचा दुचाकीवरून अपघात झाला त्यात ते गंभीर जखमी झाले सोशल नेटवर्किंग साईटवर याची माहीती गावातील तरूणांनी टाकल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यापासून थेट आर्थिक मदतीसाठी देखील आवाहन करण्यात आले अवघ्या काही तासांत आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला व ५१  हजार रूपये जमा झाले आज ही रक्कम त्यांना धनादेश द्वारे देण्यात आली.

या वेळी आनंदसिंधु वृध्दाश्रमाचे संचालक विलास लोंढे महाराज, खंडोबा देवस्थानचे विश्वस्त चंद्रभान ठुबे, शिक्षक विजय काकडे, प्रमोद खामकर, किसन सोनावळे, हरी व्यवहारे, सचिन गाडीलकर,श्रीकांत ठुबे,धनंजय व्यवहारे, बापू भागवत, अरूण गायकवाड उपस्थित होते.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Financial assistance to the staff of Kanhur Plateau Gram Panchayat