
शिर्डी : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ हे महत्त्वाचे विमानतळ असेल. त्यामुळे हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी नूतनीकरण आणि विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केल्या.