अहमदनगर : भरदिवसा गावठी पिस्तुलातून गोळीबार; तरुण ठार

Death
Deathesakal
Updated on

राहुरी (जि. अहमदनगर) : गुंजाळे (ता. राहुरी) येथे आज (सोमवारी) सकाळी नऊ वाजता भरचौकातील एका टेलरच्या दुकानात गावठी पिस्तुलातून गोळीबार झाला. एका अविवाहित तरुणाच्या छातीत गोळी घुसली. आसपासच्या ग्रामस्थांनी व कुटुंबीयांनी दुकानात धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला तात्काळ नगर येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीचा तरुणाचा मृत्यू झाला होता.

आत्महत्या कि खून...?

प्रदीप एकनाथ पागिरे (वय २५, रा. गुंजाळे) असे मृताचे नाव आहे. तो टेलरिंग व्यवसाय करीत होता. या घटनेमुळे तालुक्यात गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट झाल्याचे अधोरेखित झाले आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.

पोलिस उपअधीक्षक मिटके यांनी सांगितले की, आज सकाळी नऊ वाजता प्रदीप एकटाच दुकानात होता. त्याची आई व त्याचा अक्षय नवले (रा. गुंजाळे) नावाचा एक मित्र दुकानाच्या बाहेर बोलत होते. एवढ्यात दुकानातून गोळीबार झाल्याचा आवाज आला. सर्वजण दुकानात धावले. प्रदीप रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मित्र अक्षयने त्याला नगर येथे खाजगी रुग्णालयात हलविले. परंतु, उपचारापूर्वी त्याचे निधन झाले होते.

Death
आक्षेपार्ह संभाषण व्हायरल झाल्याने श्रीरामपूरचे दोन पोलिस कर्मचारी निलंबित

प्राथमिक चौकशीत प्रदीप पागिरे याने गावठी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे, सुरुवातीला राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताच्या उत्तरीय तपासणीच्या अहवालात व पोलिस तपासात मृताने आत्महत्या केली की खून झाला याविषयी स्पष्टता समोर येईल. त्यानुसार गुन्ह्यातील कलमे वाढविली जातील. घटनेत वापरलेली गावठी पिस्तूल कोणाची आहे. ती कोणाकडून खरेदी केली आहे. ती कोणत्या उद्देशाने खरेदी केली. आत्महत्या असल्यास नेमके कारण कोणते. याविषयी सविस्तर पोलिस तपास केला जाईल. असेही पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले.

Death
विवाहितेचे हात-पाय धरून फिनेल पाजून खून करण्याचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com