esakal | पावसाने नगर महापालिकेच्या गटारस्वच्छतेचे पितळ उघडे
sakal

बोलून बातमी शोधा

first rain damage sewer in nagar

पावसाने नगर महापालिकेच्या गटारस्वच्छतेचे पितळ उघडे

sakal_logo
By
सकाळवृत्त सेवा

नगर : शहरात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सखल भागातील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. यातच जुलै महिन्यातील पहिल्या मोठ्या पावसाने महापालिकेच्या गटारस्वच्छतेच्या कामांची पोलखोल केली आहे. १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर हा पाऊस झाला. (first-rain-damage-sewer-in-nagar-built-by-municipal-corporation-marathi-news)

पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी

शहरात आज दुपारी आकाश ढगांनी दाटून आले. दुपारी साडेतीनच्या सुमारास शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे दीड तास चाललेल्या या पावसामुळे शहरातील सखल भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. यात चितळे रस्ता, लक्ष्मी कारंजा, पटवर्धन चौक, नालेगाव, अमरधाम रस्ता, नीलक्रांती चौक, दिल्ली गेट आदी भागांतील रस्त्यांचा यात समावेश होता. गटारस्वच्छतेची कामे योग्य न झाल्याने पावसाचे पाणी गटारांतून न वाहता गटारांच्या पाण्यासह रस्त्यांवरून वाहत होते. पावसामुळे सायंकाळी शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी दिसून येत होते. नालेगाव मंडलाधिकारी कार्यालयासमोर गुडघाभर पाणी जमा झाले होते.

जिल्‍ह्यातही या पावसाने दमदार हजेरी लावली. नगर व श्रीगोंदे तालुक्यांलगतची गावे, श्रीगोंदे तालुक्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळल्याने बळिराजा मात्र सुखावला आहे.

हेही वाचा: एसटीत पुन्हा सुरू होणार टिकटिक? कंपनीचा करार संपतोय

मैलामिश्रित पाणी रस्त्यावर

गटारस्वच्छतेची कामे योग्य न झाल्याने नीलक्रांती चौकात बंद गटारे तुंबली होती. तुंबलेल्या गटारांतील काळे मैलामिश्रित पाणी रस्त्यांवरून वाहत होते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न शहरात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खड्ड्यांमुळे अपघात

शहरात अमृत भुयारी गटार योजनेची कामे प्रलंबित आहेत. या कामामुळे रस्ते खोदण्यात आले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यांत गेल्याने, ते न दिसल्याने शहरात दुचाकीस्वारांचे अपघात झाले.

(first-rain-damage-sewer-in-nagar-built-by-municipal-corporation-marathi-news)

हेही वाचा: केस पांढरे झाले? अशा पद्धतीने केमिकलविना केस करा काळे

loading image