esakal | एसटीत पुन्हा सुरू होणार टिकटिक? कंपनीचा करार संपतोय
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीत पुन्हा सुरू होणार टिकटिक? कंपनीचा करार संपतोय

एसटीत पुन्हा सुरू होणार टिकटिक? कंपनीचा करार संपतोय

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : एसटीतील प्रवाशांना ईटीआयएमद्वारे मिळणारे तिकीट बंद होणार (paper tickets again ST) आहे. जुन्यापद्धतीचे तिकीट आणि त्याला छिद्र करण्यासाठी होणारी टिकटिक पुन्हा सुरू होणार असल्याची चर्चा राज्यभरात सुरू आहे. ईटीआयएम उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीचा करार संपुष्टात (Company contract terminated) येत असल्याने चर्चेला बळ मिळते आहे. अधिकाऱ्यांनी मात्र, जुने तिकीट पुन्हा सुरू होणार असल्याचा दावा फेटाळला आहे. चर्चा, दावे, प्रतिदाव्यांमुळे एसटी कर्मचारी संभ्रमात (ST staff in confusion) असून, राज्यभरात गोंधळात गोंधळ सुरू आहे. (Indications-of-paper-tickets-again-in-ST)

पुन्हा जुन्या तिकीटांसंदर्भातील चर्चा सर्वप्रथम व्हॉट्‍सॲपवरून सुरू झाली. सोशल मीडियावरून ती झपाट्याने पसरली. जुन्या पद्धतीचे टप्पे निहाय तिकीट देताना विशिष्‍ट क्रमांकावर पंचिंग केले जाते. या प्रकाराबाबत नवीन कर्मचाऱ्यांना फारशी माहिती नाही. ऐनवेळी गोंधळ नको म्हणून चर्चा सुरू होताच काही आगारांनी नवीन कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू केले. प्रशिक्षणासंदर्भातील परिपत्रकही कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्‍सॲप ग्रुपवरून झपाट्याने व्हायरल झाले.

हेही वाचा: बापरे! कर्जासाठी बॅंक व्यवस्थापकाकडून शरीरसुखाची मागणी

ईटीआयएम उपलब्ध करून देणाऱ्या ट्रायमॅक्स कंपनीचा करार १५ जुलैला संपत असल्याची माहिती समोर आली आणि जुन्या तिकिटांच्या विषयाला पुन्हा खतपाणी मिळाले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार ऐनवेळी मशीन बंद पडल्यास जुन्याच पद्धतीचे तिकीट प्रवाशांना दिले जाते. नवीन कर्मचाऱ्यांना त्याबाबत माहिती असावी म्हणून प्रशिक्षण घेतले जात असावे. परंतु, ईटीआयएम तिकीट बंद होणार असल्याची सूचना मुख्यालयाकडून अद्याप आली नसल्याचे त्यांचे म्हणणे पडले.

पूर्व विदर्भात तीन हजारांवर यंत्र

राज्यभरात ईटीआयएमच्या उपलब्धतेसाठी ट्रायमॅक्स कंपनीसोबत पाच वर्षांचा करार करण्यात आला आहे. त्याची मुदत लवकरच संपते आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांतील बसेसमध्ये एकूण ३ हजार ३६३ यंत्रांचा उपयोग होते. ऐनवेळी यंत्र खराब झाल्यास व्यत्यय नको म्हणून अतिरिक्त यंत्र उपलब्ध असते.

हेही वाचा: कोण रूपाली चाकणकर? मी फक्त शरद पवार व अजित पवारांना ओळखते

स्मार्ट कार्डधारकांचे काय?

एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसह सवलती मिळणाऱ्यांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले आहेत. ईटीआयएम यंत्र हे कार्ड रिड करू शकते. हे कार्ड रिड करणारे दुसरे कोणतीही यंत्रणा महामंडळाकडे नाही. अशात मशीन बंद झाल्यास स्मार्ट कार्डधारकांचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

(Indications-of-paper-tickets-again-in-ST)

loading image