esakal | केस पांढरे झाले? अशा पद्धतीने केमिकलविना केस करा काळे
sakal

बोलून बातमी शोधा

केस पांढरे झाले? अशा पद्धतीने केमिकलविना केस करा काळे

केस पांढरे झाले? अशा पद्धतीने केमिकलविना केस करा काळे

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : आजकाल लहान वयात केस पांढरे (hair news) होत आहेत. धूळ, प्रदूषण, ताण-तणाव किंवा आनुवंशिक आजारांमुळे कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. पांढरे केस लपवण्यासाठी अनेक जण हेअर कलर (hair color), हेअर डायचा (Hair dye) वापर करतात. मात्र, त्यामध्ये असणाऱ्या केमिकलमुळे केस कमकुवत बनतात (Chemicals weaken hair) व गळतात. काही जणांना त्वचेची ॲलर्जी होते. काही घरगुती उपाय करून केस काळे करता येतात. (Hair-turned-white?-Make-black-without-chemicals-in-this-way)

काही लोक केसांना कलर फॅशनमुळे देतात. ज्यामुळे केसांचा मूळ रंग उडतो. ज्यामुळे केस पांढरे होतात. त्यांना लपविण्यासाठी नेहमी केसांना रंग द्यावा लागतो. केमिकल किंवा रसायनयुक्त रंगांचा वापर केल्याने केसांचे नुकसान होते. केस पांढरे होण्याच्या समस्येने ग्रस्त आहात आणि केमिकलयुक्त रंगांचा वापर करायचा नाही तर घरच्या घरी या प्रकारे केसांना रंग द्या.

हेही वाचा: बापरे! कर्जासाठी बॅंक व्यवस्थापकाकडून शरीरसुखाची मागणी

 • खोबरेल तेलात लिंबाचा रस घालून हलक्या हाताने मालीश करा. त्यामुळे केस काळे आणि चमकदार होतील.

 • आवळ्याचे बारीक तुकडे गरम खोबरेल तेलात मिक्स करून केसांना लावा. आवळ्याला मेंहदीमध्येसुद्धा मिसळून लावा. नियमित आवळा खाण्यानेसुद्धा केस काळे होतात.

 • आंघोळ करायच्या दहा मिनिटे आधी कांद्याचा रस डोक्याला लावा. यामुळे केसांचे गळणे थांबते.

 • केसांना लालसर तपकिरी रंग देण्यासाठी मेंदी, दही आणि चहापत्तीचा वापर करा.

 • ब्लॅक टीच्या अर्काने केस धुवा. दोन दिवसांतून एकदा हे केल्याने फरक दिसून येईल.

 • कोरफड जेलमध्ये लिंबाचा रस टाकून पेस्ट बनवून केसांना आणि मुळांना लावा. हे नियमित लावल्याने पांढरे केस काळे होतील.

 • पेरूची पाने वाटून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट केसांना लावा.

 • कडीपत्ता खोबरेल तेलात घालून रोज त्या तेलाने नियमितपणे केसांना मसाज करा. रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी केस धुवा.

 • मोहरीच्या तेलामध्ये कडीपत्ता उकळून घ्या. हे तेल नियमित रात्री झोपताना केसांना लावा.

 • मेहंदी पावडर आणि दह्याचे समान मिश्रण एकत्र करून केसांचा मसाज करा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा.

 • लिंबाच्या रसाचे मिश्रण केसांना पूर्णपणे सॅच्युरेट होईपर्यंत लावत राहा. यामुळे तुमच्या केसांचा रंग हलका होईल.

 • दोन दिवसांतून एकदा ब्लॅक टी किंवा कॉफीच्या पाण्याने केस धुतल्यामुळे केसांचा रंग काळा होतो.

 • पॅनमध्ये गरम पाणी घेऊन त्यात चहा पत्ती टाका. पाणी थंड झाल्यावर या पाण्याने केस धुवा. यानंतर शॅम्पू लावू नका.

 • केस काळे करण्यासाठी जास्वंदाचे फुल अत्यंत गुणकारी आहे. जास्वंदाचे वाळलेले फुल तेलासोबत २० मिनिटे उकळून घ्या. उकळलेल्या तेलाला थंड करून लावा. दहा ते पंधरा दिवसात नक्कीच फायदा मिळेल.

(Hair-turned-white?-Make-black-without-chemicals-in-this-way)

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image