esakal | पहिल्याच पावसामध्ये  रस्त्याची लागली वाट! 
sakal

बोलून बातमी शोधा

In the first rain Roads bad

पहिल्या पावसाने येथील शिवाजी चौक परिसर, सय्यदबाबा चौक, गिरमे चौक, दशमेश चौक, सिंधी मंदिर परिसर, नॉर्दर्न ब्रॅंच, जवाहर कारखाना, बसस्थानक परिसर, शिक्षक बॅंक चौक, मौलाना आझाद चौक, बेलापूर व गोंधवणी रस्त्यांवर खड्डे तयार झाले. त्यांत पाणी साचून रोज लहान-मोठे अपघात होत आहेत.

पहिल्याच पावसामध्ये  रस्त्याची लागली वाट! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर :  पहिल्याच पावसात शहरातील प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पालिकेने शहरातील काही रस्त्यांवरील खड्डे बुजविले असले, तरी पावसाळ्यात वर्दळीच्या रस्त्याची दुरवस्था कायम आहे. 
पहिल्या पावसाने येथील शिवाजी चौक परिसर, सय्यदबाबा चौक, गिरमे चौक, दशमेश चौक, सिंधी मंदिर परिसर, नॉर्दर्न ब्रॅंच, जवाहर कारखाना, बसस्थानक परिसर, शिक्षक बॅंक चौक, मौलाना आझाद चौक, बेलापूर व गोंधवणी रस्त्यांवर खड्डे तयार झाले. त्यांत पाणी साचून रोज लहान-मोठे अपघात होत आहेत.

अवश्य वाचा ः तब्बल 57 गावातील पाणी दुषीत

पालिकेने अनेकदा रस्तादुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला; परंतु आजही अनेक रस्त्यांवरील खड्डे कायम आहेत. त्यामुळे हा निधी कुठे गेला, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

हेही वाचा ः सावधान ः नगरमध्ये आहेत 12 इमारती

सय्यदबाबा चौक, अमरधाम रस्त्याची दुरवस्था भयानक आहे. अमरधाम रस्त्यावर गटाराचे पाणी येते. परिसरातील उकिरड्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. कालव्याच्या नवीन पुलाकडून अमरधामकडे जाणारा सुमारे हजार फुटांचा रस्ता पक्का करावा, अशी मागणी होत आहे. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. 


पालिकेने रस्तेदुरुस्ती व देखभालीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला. मात्र, रस्त्यांवरील खड्डे कायम आहेत. अमरधामकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. त्यामुळे अंत्यविधीसाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याबाबत पालिकेच्या बैठकीत अनेकदा चर्चा झाली. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही. पालिकेने तत्काळ शहरातील सर्वच रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे. 
- करण ससाणे, उपनगराध्यक्ष 

loading image
go to top