esakal | शनिअमावस्येला इतिहासात प्रथमच शिंगणापुरात शुकशुकाट
sakal

बोलून बातमी शोधा

For the first time in the history of Shani Jayanti, there are no devotees in Shinganapur

कोरोना संसर्गाची काळजी म्हणून विश्वस्त मंडळाने 17 मार्च पासुन दर्शन बंदचा निर्णय घेतला होता.या निर्णयानंतर शनिजयंती,उदासी महाराज पुण्यतिथी व गुढीपाडवा उत्सव रद्द करण्यात आले होते.

शनिअमावस्येला इतिहासात प्रथमच शिंगणापुरात शुकशुकाट

sakal_logo
By
विनायक दरंदले

सोनई : कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून शनिशिंगणापुर येथील स्वयंभू शनिमंदीर बंद असल्याने गावाच्या इतिहासात प्रथमच आज शनिअमावस्या असतानाही भाविकांची मांदियाळी जमली नाही.

शनिवारी अमावस्या आल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरत होती.यात्रेला दिवसभरात आठ ते दहा लाख भाविक स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन घेत होते.

कोरोना संसर्गाची काळजी म्हणून विश्वस्त मंडळाने 17 मार्च पासुन दर्शन बंदचा निर्णय घेतला होता.या निर्णयानंतर शनिजयंती,उदासी महाराज पुण्यतिथी व गुढीपाडवा उत्सव रद्द करण्यात आले होते.

आज शनिअमावस्या व दिवाळी सण असल्याने सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत भाविकांनी तुरळक गर्दी केली होती. मात्र महाद्वार समोरचा दर्शनपथ बंद असल्याने व तेथे पोलिस व सुरक्षा विभागाचा बंदोबस्त असल्याने आलेल्या भाविकांनी महाद्वारातील सीसीटीव्हीच्या शनिदर्शनचा लाभ घेतला.

मंदीर बंद असतानाही काही पुजा साहित्याच्या दुकाना उघडल्या होत्या.शनिअमावस्या असताना गावात प्रथमच शुकशुकाट पाहण्यास मिळाला.