

Ahilyanagar Crime
Sakal
अहिल्यानगर: जिल्ह्यात ठिकठिकाणी पवनचक्कीच्या कॉपर वायरची चोरी करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी चार गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यांच्याकडून पाच लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, काही आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.