
अहिल्यानगर: जिल्ह्यातील सर्व धरणसाठे नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आले आहेत. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टी, धरणातील विसर्ग आणि नदीपात्रातील अतिक्रमणामुळे जिल्ह्यातील आठ प्रमुख नद्यांवरील २२३ गावे पूरप्रवण होत आहेत. तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात आले आहेत.