
Young volunteers in Solapur successfully rescue 35 villagers trapped by floodwaters.
Sakal
-विनायक दरंदले
सोनई : माका (ता. नेवासे) येथील कोकाटेवस्तीला लेंडा, खारा व चाफा नदीच्या पुराने वेढा दिला. तेथे अडकलेल्या सहा कुटुंबांतील ३५ जण देवाचा धावा करत होते. एका मोबाईलद्वारे सामाजिक कार्यकर्ते सहदेव लोंढे यांचा संपर्क झाला आणि युवकांनी तब्बल चार तास लढा देऊन रेस्क्यू ऑपरेशन राबवत सर्वांची सहिसलामत सुटका केली. सरकारच्या मदतीशिवाय जीवावर उदार होत राबविलेल्या मदतीचे तालुक्यात कौतुक होत आहे.