Family struggles to rebuild after flood destruction, yet their spirit remains unbroken.

Family struggles to rebuild after flood destruction, yet their spirit remains unbroken.

Sakal

Ahilyanagar Flood: 'मोडून पडला संसार पण, मोडला नाही कणा'; महापुराच्या तडाख्यातून सावरण्यासाठी धडपड..

Surviving the Deluge: महापुराचा नदीकाठच्या वाघोली, वडुले, ढोरजळगाव, आपेगाव, आखातवाडे, मळेगाव, सामनगाव, लोळेगाव, जोहरापूर आदी गावांना फटका बसला. रहिवासी भागातील घरेदारे, जनावरांचे गोठे, कांदा चाळी, पिके यामध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले.
Published on

अमरापूर : खचलेले रस्ते, वाहून गेलेले पूल, घरात पाणी शिरून सर्वत्र झालेला चिखल, भिजून खराब झालेले धान्य, कपडे, नेस्तनाबूत झालेली पिके हे मन विपण्ण करणारे सार्वत्रिक चित्र आज पूर ओसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी ढोरा नदीकाठच्या गावात पहायला मिळाले. अंगणात आलेल्या गंगामाईने सर्वत्र एका दिवसात होत्याचे नव्हते करून टाकले, तरी मोडून पडला संसार पण, मोडला नाही कणा या ओळींची आठवण पूर परिस्थितीनंतर झगडणाऱ्या नागरिकांना पाहून येत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com