
पाथर्डी : परिविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत चार लाख ६२ हजार रुपयांची दारू, तसेच मावा व दोन कोयते जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले, तर खाडे यांनी यापूर्वी एका मावा अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यावेळी फरार झालेल्या एका आरोपीलाही पकडण्यात आले. ही कारवाइ आज (ता.३०) करण्यात आली.