

Scientific Edge for Police: Modern Forensic Van Introduced in Shrirampur
Sakal
श्रीरामपूर : गुन्ह्यांचा तपास अधिक परिणामकारक आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून श्रीरामपूर पोलिस उपविभागाला अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन भेट देण्यात आली आहे. न्याय साहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या विशेष उपक्रमाअंतर्गत उपलब्ध झालेल्या या व्हॅनमुळे आता घटनास्थळीच वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यापासून त्यांचे प्राथमिक विश्लेषण करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया तत्काळ पार पाडता येणार आहे.