esakal | वन विभागाने अडवली वारणवाडीची पाणी योजना
sakal

बोलून बातमी शोधा

Forest department obstruction in water scheme

वन विभागातील अधिकाऱ्यांनी 12 जून 2020 रोजी त्रुटी काढल्या. या सर्व त्रुटींची पूर्तता 15 जूनला करण्यात आली, तरीही या कामास वन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येत नाही.

वन विभागाने अडवली वारणवाडीची पाणी योजना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत वारणवाडी (ता. पारनेर) येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामात वन विभागामुळे आडकाठी आली.

वन विभागाने नाहरकत प्रमाणपत्र त्वरित न दिल्यास मंगळवार (ता. सात) पासून उपोषण करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी दिला आहे. 

अवश्य वाचा ः सन्मान नाही करता आला तर अपमान तरी करू नका

दाते यांनी म्हटले आहे, की वारणवाडी (ता. पारनेर) येथे पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 35 लाख मंजूर झाले आहेत. या योजनेच्या कामासाठी वनक्षेत्रातील सर्व्हे नंबर 472मधील गट नंबर 41 येथे एकूण 2204.47 हेक्‍टर क्षेत्रापैकी 0.0078 हेक्‍टर व पाइपलाइनकरिता 0.06 हेक्‍टर असे एकूण 0.0678 हेक्‍टर क्षेत्र मिळण्याचा प्रस्ताव सहा जानेवारी 2020 रोजी सादर केला होता.

क्लिक करा ः अभ्यासातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते ः जगताप
 

या प्रस्तावात वन विभागातील अधिकाऱ्यांनी 12 जून 2020 रोजी त्रुटी काढल्या. या सर्व त्रुटींची पूर्तता 15 जूनला करण्यात आली, तरीही या कामास वन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येत नाही. या योजनेचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. या कामासाठी वन विभागाने नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, यावर जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीत चर्चा झाली आहे. 

वन विभागाच्या कारभारामुळे ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहत असून, त्वरित नाहरकत प्रमाणपत्र न दिल्यास मंगळवारपासून आपण वन विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दाते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

loading image