
संगमनेर: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या व्हिडिओने राज्यभर खळबळ उडाली आहे. भंडारे यांनी आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल, अशी थेट धमकी दिली आहे. याबाबत महाराष्ट्र काँग्रेस, विजय वडेट्टीवर या नेत्यांनी ट्विट करून तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.