

Ex-Minister Prajakta Tanpure warns of ‘Rasta Roko’ protest demanding immediate repair of pothole-ridden highways.
Sakal
राहुरी : राहुरी शहरात अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमुळे प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यात, पावसाचे पाणी साचल्याने निर्माण झालेल्या डबक्यात वाहनांचे अपघात होत आहेत. पुन्हा एखाद्या निष्पाप प्रवाशाच्या मृत्यूची वाट पाहताय काय? आठ दिवसांचा अल्टीमेटम देतो. रस्त्यावरील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करा. रस्त्याच्या नवीन कामाची गती वाढवा. अन्यथा तीव्र रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.