esakal | बटाटा बियाणे दिले, मात्र दलालाने पावत्याच दिल्या नाहीत
sakal

बोलून बातमी शोधा

Former MLA Vaibhavrao Peachad demand to the Collector

बटाटे बियाणे दिले मात्र त्याच्या पावत्या दलालाने दिल्या नाहीत.

बटाटा बियाणे दिले, मात्र दलालाने पावत्याच दिल्या नाहीत

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : बटाटे बियाणे दिले मात्र त्याच्या पावत्या दलालाने दिल्या नाहीत. तर राहुरी कृषी विद्यापीठ व जिल्हा कृषी अधिकारी यांनी ब्राह्मण वाडा, करडी येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यांची पाहणी केली. बियाणे खराब असल्याचा अहवाल दिला. मात्र, या बियाणांच्या पावत्या काही शेतकऱ्यांकडे आहेत तर काहींकडे नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.  जिल्हा कृषी अधिकारी यांनी याबाबत संबधित कंपनीला नोटीस दिल्याचे समजते.

जिल्ह्रातील अकोले हा आदिवासी तालुका आहे. तालुक्यातील अनेक भागामध्ये मोठया प्रमाणात भात, उडीद, सोयाबीन, हुलगे, वरई, नागली, भुईमुग इ. पिके घेतले जातात. यावर्षामध्ये मोठया प्रमाणात बोगस बियाणे संबंधित शेतकऱ्यांना कंपन्याकडून उपलब्ध झालेले आहे. या अनुषगांने ब्रााम्हणवाडा, करंडी, कळंब व मन्याळे या परिसरातील बटाटयाच्या पिकांची मोठी हानी झाल्याचे दिसून येत आहे.

ब्रााम्हणवाडा, करंडी परिसरात बटाटयाच्या झाडांची मोठया प्रमाणात वाढ झाली परंतु झाडाला बटाटे आलेच नाही. तसेच सोयाबीनच्या बाबतीत ही हेच दिसून येत आहे. पावसाळी भुईमुग, उडीद, वरई, नागली या पिकांचे देखील बोगस बियाणे आल्याने त्यांचे सरासरी उत्पन्न कमी होणार आहे, अशी शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे. म्हणून कृषि विभागाने तातडीने पंचनामे करुन मदतीचा हात देणे अत्यंत गरजेचे आहे.

कोरोना काळात 7 महिन्यांपासून कोणत्याही प्रकारचा रोजगार, मजुरी शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. तसेच खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांनी बँकाकडून कर्ज घेतलेले आहे. परंतु हमखास पिकांची खात्री नसल्याने व या बोगस बियांणामुळे उत्पादन क्षमता घटणार आहे. मग बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा मुख्य प्रश्न या शेतकऱ्यांपुढे उभा आहे. 

आगामी रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा, मका, वटणा, भुईमुग, मसुर, हुलगे, तुर इ. पिकांचे चांगल्या प्रतीचे बियाणे हंगामापूर्वीच शासनाने मोफत उपलब्ध करुन दयावेत बोगस बियाणे बाजारात कंपन्यांनी आणले. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे असल्याने संबंधित पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश आपल्या पातळीवरुन देण्यात यावेत.

शेतकऱ्यांना सरसकट मदतीचा हात देवून त्यांना व त्यांच्या कुंटुबियांना दिलासा देण्यासाठी आपल्या विभागाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी, आग्रही विनंती माजी आमदार वैभवराव पिचड यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर