
कोरोना महामारीच्या संकटात शारीरिक व्यायाम व खाण्याचे पथ्य किती महत्त्वाचे आहेत. याचे महत्व सर्वानाच समजले.
सोनई (अहमदनगर) : कोरोना महामारीच्या संकटात शारीरिक व्यायाम व खाण्याचे पथ्य किती महत्त्वाचे आहेत. याचे महत्व सर्वानाच समजले. आयुष्यासाठी पैसा सर्वस्व नसून आरोग्य हीच खरी दौलत आहे, असे प्रतिपादन माजी पंचायत समितीच्या सभापती सुनिता गडाख यांनी व्यक्त केले.
साडेआठ एकरांत पेरूतून कमावले ४० लाख, दैठणे गुंजाळच्या शेतकऱ्याची दुष्काळासोबत टक्कर
स्नेह फाऊंडेशनच्या वतीने ना नफा ना तोटा तत्वावर सुरु करण्यात आलेल्या फिटनेस सेंटर व योगा क्लासेस उदघाटनावेळी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या सुरेखा साळवे, ओमशांती परिवाराच्या उषादिदी, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.अभिराज सुर्यवंशी, सरपंच धनंजय वाघ उपस्थित होते.
नगर शहर होणार पंचतारांकीत, महापालिकेची फुल्ल तयारी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगिता जोरवर-पिसाळ यांनी केले. उपक्रमाची माहिती प्रशिक्षक संजय गर्जे यांनी दिली. गोल्डन ग्रुप व स्नेह फाऊंडेशनच्या वतीने
कोरोना संकटात उत्कृष्ट काम केलेल्या आशासेविका, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.सुर्यवंशी, डाॅ.राजेंद्र कसबे, सोनईचे सकाळचे बातमीदार विनायक दरंदले यांचा कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार राजेंद्र सानप, मनिषा जवादे, डाॅ.संजय तुवर यांनी केला. उषा दगडे, ग्रामसेवक आर.बी.बटोळे, डाॅ.संतोष गुरसळ यांचे भाषण झाले. सूत्रसंचालन नितीन दरंदले यांनी केले तर आभार संतोष क्षीरसागर यांनी मानले.