esakal | महिलेच्या घरात घुसून अत्याचार; माजी सरपंचास 2 वर्षांची शिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

arrest

महिलेच्या घरात घुसून धमकावले; माजी सरपंचास शिक्षा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अहमदनगर : तालुक्‍यातील एका गावामध्ये राहणाऱ्या पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माजी सरपंचांनी २००८ ते २०१४ या कालावधीत दोन ते तीन वेळा शारीरिक अत्याचार केला. सदरची बाब कोणाला सांगितली तर "तुला जीवे ठार मारीन,' अशी धमकी दिली. महिलेला फोन करून तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली

महिलेच्या घरात अनाधिकाराने घुसून धमकावल्याबद्दल निमगाव घाणा (ता. नगर) चे माजी सरपंच संजय परसराम कुलट-पाटील यांना दोन वर्षांची सक्‍तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश अमित शेटे यांनी ठोठावली. या महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात ता. २४ मे २०१५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संजय कुलट-पाटील याच्याविरोधात भा. दं. वि. कलम ३७६ (२) (एन), ४५२, ५०६ तसेच अनुसूचीत जाती-जमाती कायदा (ऍट्रॉसिटी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने फिर्यादी, फिर्यादीची आई, फिर्यादीचा मुलगा, आणि फिर्याद घेणाऱ्या महिला पोलिस उपनिरीक्षक स्वाती देबडकर यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस फिर्यादी ही फितूर झाली. परंतु, फिर्यादीची आई, फिर्यादीचा मुलगा आणि पोलिस उपनिरीक्षक स्वाती देबडकर यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

हेही वाचा: पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; नातेवाइक संतप्त

अत्याचाराचा गुन्हा सिद्ध झाला नाही. महिलेच्या घरात अनाधिकाराने घुसून धमकावल्याबद्दल दोषी धरण्यात आले. भादंवि ५०६ खाली दोषी धरून दोन वर्ष सक्‍तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्‍तमजुरी तसेच भादंवि ४५२ खाली दोन वर्ष सक्‍तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावली. सक्‍तमजुरीच्या दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. दंडापैकी पाच हजार रुपये फिर्यादीस देण्याचा आदेश दिला आहे. ऍड. मंगेश दिवाणे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

हेही वाचा: राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के पगारवाढ मंजूर!

loading image
go to top