esakal | पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरूणाची आत्महत्या, नातेवाइकांचा आक्रोश
sakal

बोलून बातमी शोधा

nagar suicide

पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; नातेवाइक संतप्त

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (जि.अहमदनगर) : एका गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे संतप्त झालेल्या त्याच्या नातेवाइकांनी मृतदेहासह शेवगाव पोलिस ठाण्यासमोर संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. काय घडले नेमके?

तरूणाची राहत्या घरी आत्महत्या

याबाबत माहिती अशी आदित्य अरुण भोंगळे (वय १८, रा. बालमटाकळी) हा आई संगीतासह शनिवारी (ता. ४) शेतात काम करीत होता. यावेळी शेवगाव पोलिस ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांनी एका गुन्ह्यात संशयित म्हणून त्यास ताब्यात घेतले. चौकशी करून रविवारी (ता. ५) दुपारी त्यास सोडून दिले. त्याने मंगळवारी रात्री आत्महत्या केली. पोलिसांनी कारवाईची भीती दाखवत त्याच्याकडून रोख ४३ हजार रुपये घेऊन, दोन हजार रुपये ऑनलाइन देण्यास भाग पाडले, तसेच त्याला मारहाणही करण्यात आली. पोलिसांच्या जाचाला कंटाळून त्याने राहत्या घरी आत्महत्या केली असल्याचा आरोप त्याची आई संगीता भोंगळे यांनी केला.

याबाबत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल न केल्याने नातेवाइकांनी आज (बुधवारी) दुपारी दोन वाजता मृतदेह थेट पोलिस ठाण्यात नेला, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात गोंधळ उडाला. तणाव वाढल्याने निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी संबंधित पोलिसांची चौकशी करून कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. रात्री उशिरा बालमटाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा: सभेत पक्षप्रतोदांचा बोलताना गेला तोल! भाजप सदस्य आक्रमक

संतप्त नातेवाईकांचा आक्रोश

एका गुन्ह्यात संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे संतप्त झालेल्या त्याच्या नातेवाइकांनी मृतदेहासह शेवगाव पोलिस ठाण्यासमोर संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी संबंधित पोलिसांची चौकशी करून, ते दोषी आढळल्यास गुन्हे दाखल करू, असे आश्‍वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

मृताची आई व नातेवाइकांची पोलिसांबद्दल तक्रार असल्याने, चौकशी करून ते दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. - सुदर्शन मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी

हेही वाचा: सभेला यायचं अन् उपाशी जायचं; सदस्यांची झेडपीच्या सभेत नाराजी

loading image
go to top