व्हीआरडीईचे स्थलांतर होणार नाही : गांधी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

गांधी म्हणाले, 'माझे 1980 पासून या संस्थेशी ऋणानुबंध आहेत. सोमवारी दुपारी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली.

अहमदनगर : नगरमधील व्हीआरडीई संस्थेचे स्थलांतर होणार नाही, अशी माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. संपूर्ण देशात सध्या राष्ट्रीयकृत बॅंकांचे जसे विलीनीकरण केले जात आहे. त्याच धर्तीवर डीआरडीओ संस्थेच्या काही प्रकल्पांचे एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती डीआरडीओचे अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी दिली, असे माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी सांगितले. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

व्हीआरडीई कर्मचारी कार्य समितीच्या सदस्यांनी गांधी यांची भेट घेतली तेव्हा ते बोलत होते. गांधी म्हणाले, 'माझे 1980 पासून या संस्थेशी ऋणानुबंध आहेत. सोमवारी दुपारी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली. रात्री संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला, त्या वेळी त्यांना नगरमध्ये व्हीआरडीई राहणे किती महत्त्वाचे आहे, याची माहिती देऊन संस्थेचे नगरमधून स्थलांतर होऊ नये, अशी विनंती केली. या वेळी मंत्री राजनाथ सिंह यांनी, नगरमधून व्हीआरडीईचे स्थलांतर होणार नाही, असे आश्वासन दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Union Minister Dilip Gandhi has said that VRDE will not be relocated