esakal | जामखेडमध्ये चार दुकाने सात दिवसांसाठी सील

बोलून बातमी शोधा

Four shops in Jamkhed have been sealed for seven days

दुकान मालकांसह त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. 

जामखेडमध्ये चार दुकाने सात दिवसांसाठी सील
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जामखेड (अहमदनगर) : शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेली चार कापड दुकाने प्रशासनाने सात दिवसांसाठी 'सील' केली आहेत. अन्य दुकानांकडेही लक्ष केंद्रित केले आहे. दुकान मालकांसह त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. 

जिल्ह्यात 31 हजार नवीन वीजजोडणी कार्यान्वित

जामखेड शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला असून हा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने सतत गर्दी होणारी ठिकाणे, कोरोना बाधित प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तसे पोस्टरही लावले आहेत. शहरातील ज्या दुकानात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळतील ती दुकाने 'सील' करण्याची कार्यवाही हाती घेतली आहे. रविवार (ता. चार) शहरातील चार कापड दुकाने प्रशासनाने सील केली आहेत. दुकाने सील करताना काही दुकानदार तयारी दाखवित नव्हते. मात्र, प्रशासकीय यंत्रणेने सर्वांना सारखीच कार्यवाही करणार असल्याचा कित्ता गिरविला आहे. जो कोणी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणार नाही. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.