esakal | जिल्ह्यात 31 हजार नवीन वीजजोडणी कार्यान्वित
sakal

बोलून बातमी शोधा

31 thousand new power connections have been commissioned in Ahmednagar district

महावितरणकडून राज्यात दरवर्षी मागणीनुसार साधारणतः 9 ते 10 लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात.

जिल्ह्यात 31 हजार नवीन वीजजोडणी कार्यान्वित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर  : कोरोना विषाणूच्या महामारीच्या काळात देखील महावितरणकडून ग्राहकांना वीजविषयक सर्व सेवा सुरळीत व अविरतपणे देण्यात येत आहे.  गेल्या आर्थिक वर्षात राज्यात सर्व वर्गवारीतील आठ लाख दोन हजार 782 नवीन वीजजोडण्या तर नगर जिल्ह्यात 31 हजार नवीन वीज जोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आवश्‍यक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात येत असल्याने प्रलंबित वीजजोडण्या देखील ताबडतोब कार्यान्वित करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले. 

अवैध वाळूउपसा होऊ देणार नाही : डॉ. सुजय विखे पाटील

महावितरणकडून राज्यात दरवर्षी मागणीनुसार साधारणतः 9 ते 10 लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मागील वर्षी मार्च ते जूनपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याचा वेग मंदावला होता. तरीही इतर वीजसेवांप्रमाणेच नवीन वीजजोडणी देण्याच्या कामात कोणताही खंड पडला नाही.
 
एप्रिल 20 ते मार्च 21 राज्यात या कालावधीत उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील 8 लाख 2 हजार 782 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. नगर मंडळामध्ये 31 हजार 697 वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वीजमीटरचा तुटवडा कमी करण्यासाठी महावितरणकडून सिंगल फेजचे 18 लाख व थ्री फेजचे 1 लाख 70 हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याचे आदेश पुरवठादारांना याआधीच देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे महावितरणच्या चारही प्रादेशिक कार्यालयांना मार्चअखेरपर्यंत 3 लाख 35 हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्यात आला आहे.