Ahilyanagar Fraud: पोलिस असल्याचे भासवून फसवणूक; ओळखपत्र दाखवत पत्ता विचारला अन्..
Fraud by Posing as Policeman: एकजण दुचाकीवर होता व दुसरा पायी. दोघांनीही पोलिस असल्याचे सांगून आपले ओळखपत्र दाखवत पत्ता विचारला. त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले.
अहिल्यानगर: पोलिस असल्याचे भासवून दोन अनोळखी व्यक्तींनी एका ७४ वर्षीय वृद्धाला विश्वासात घेऊन ५५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या व तांब्याच्या अंगठ्या घेऊन फसवणूक केली आहे. ही घटना ९ ऑगस्टला सकाळी सावेडीतील जॉगिंग पार्कजवळ घडली.