esakal | युवकांसाठी चांगली संधी; पाथर्डी तालुक्यातील ‘या’ गावात सैन्य भरतीसाठी मोफत प्रशिक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

Free training for army recruitment in Pathardi taluka

भारतीय सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना परिवर्तन प्रतिष्ठान व परिवर्तन सैनिक कल्याणकारी संघाने संधी उपलब्ध करून दिली आहे.

युवकांसाठी चांगली संधी; पाथर्डी तालुक्यातील ‘या’ गावात सैन्य भरतीसाठी मोफत प्रशिक्षण

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी (अहमदनगर) : भारतीय सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना परिवर्तन प्रतिष्ठान व परिवर्तन सैनिक कल्याणकारी संघाने संधी उपलब्ध करून दिली आहे. भरतीपूर्व प्रशिक्षण देऊन युवकांमधून राष्ट्रसेवक घडविण्याचे पवित्र काम तालुक्‍यातील भालगावसारख्या ग्रामीण भागात प्रतिष्ठान करीत आहे, असे प्रतिपादन भालगाव येथील मच्छिंद्रनाथ गडाचे महंत नवनाथ गाडे महाराज यांनी केले. 

भालगावच्या सरपंच डॉ. मनोरमा खेडकर यांच्या कल्पनेतून व ग्रामस्थांच्या सहकार्याने परिवर्तन प्रतिष्ठान आणि परिवर्तन सैनिक कल्याणकारी संघ यांच्या वतीने सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन झाले. त्यावेळी गाडे महाराज बोलत होते. प्रदूषण नियंत्रण आयुक्त दिलीप खेडकर, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, जगन्नाथ खेडकर, तुकाराम खेडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सैन्यदलातून निवृत्त झालेले अंबादास कोरडे आणि जनार्दन भष्मारे युवकांना प्रशिक्षण देणार आहेत. 

प्रशिक्षणार्थी विद्यार्थी कृष्णा सुपेकर म्हणाले, पाथर्डीच्या पूर्व भागातील युवकांना मोफत प्रशिक्षण देणारी संस्था सुरू होतेय, याचा आनंद आहे. परिवर्तन प्रतिष्ठानने युवकांना चांगली संधी निर्माण करून दिली आहे. 

परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सरपंच डॉ. मनोरमा खेडकर म्हणाले, ग्रामीण भागातील युवक लष्करात आपल्या कामगिरीने देशपातळीवर चमकावेत, यासाठी दोन एकर जागेत हे प्रशिक्षण केंद्र सुरू करीत आहोत. प्रशिक्षक अनुभवी आहेत. कोणतेही शुल्क येथे आकारले जाणार नाही. 

संपादन : अशोक मुरुमकर