

Engineering Graduate Turns Spiritual Icon: Prabhanjanbuwa’s Motivating Story
Sakal
-सतीश वैजापूरकर
शिर्डी : इंजिनिअरिंगमधील एमई पदवी संपादन केली. चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी देखील मिळाली. मात्र, बालपणापासून मनात असलेली कीर्तनाची ओढ आणि त्यासाठी सातत्याने केलेला सराव स्वस्थ बसू देईना. शेवटी नोकरी सोडली आणि कीर्तनाची वाट धरली. पुण्यातील वारजात कीर्तन करताना पद्मश्री पदवीने सन्मानित असलेल्या तालयोगी पंडित तळवळकर आणि प्रख्यात गायक सुरेश कशाळकर यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली अन् कीर्तनकार बुवा धन्य झाले. लोणी येथील युवा कीर्तनकार प्रभंजन भगत यांची ही वाटचाल कलाक्षेत्रातील मंडळींच्या दृष्टीने प्रेरणादायी आहे.