
Dr. Thete couple from Kolhar cultivates high-quality bananas now being exported to Iran.
Sakal
--सुहास वैद्य
कोल्हार : शेती करण्याचा कोणताही पूर्वानुभव पाठीशी नसताना डॉ. संजय थेटे व डॉ. मेघा थेटे यांनी कोल्हार खुर्द (ता. राहुरी) येथील दोन एकरात केळीची बाग फुलविली. त्यांच्या केळीचा डंका ईराणमध्ये वाजतो आहे. कोल्हार खुर्दमधून केळीची निर्यात करणारे थेटे दाम्पत्य पहिलेच यशस्वी शेतकरी ठरले आहेत. संजय थेटे दंतरोगतज्ज्ञ असून, त्यांच्या पत्नी आयुर्वेदच्या डॉक्टर आहेत. त्यांनी दोन एकरांत जी-९ वाणाची केळीची बाग लावली. बागेत दोन हजार २०० झाडे आहेत. ११ महिन्यांत केळी तयार झाली.