

Bharat proudly holds the police baton after achieving success through hard work despite hardships.
Sakal
-सतीश वैजापूरकर
राहाता : पक्के घर नाही, विजेचा तपास नाही. कसलीच शाश्वती नाही. अशा प्रतिकूल परिस्थीतीत हाती काठी घेऊन गायांच्या कळपाचे संगोपन करणाऱ्या युवकाच्या हाती आता पोलिसाची काठी आली आहे. गायांच्या संगोपनासोबत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारा भरत भारवाड (वय२५) गुजरात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी हाती काठी घेणार आहे. पदोपदी येणाऱ्या अडचणीवर मात करीत त्याने आपले स्वप्न साकार केले. सध्या तो कळपासह ज्या दहेगावात मुक्कामाला आहे, तेथील माजी सरपंच भगवान डांगे यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांच्या वतीने काल त्याचा सत्कार करण्यात आला.