

Innovative Farming: Bodhegaon Youth Turns Wasteland into Ber Orchard
sakal
-उद्धव देशमुख
बोधेगाव: पारंपरिक शेतीतून केवळ कुटुंबाची रोजीरोटी भागत असे. अधिकचे उत्पन्न मिळत नसल्याने बोधेगाव (ता. शेवगाव) येथील ज्ञानेश्वर घोरतळे या तरुण शेतकऱ्याने आपल्या एक एकर बरड जमिनीवर मिस इंडिया व रेड कश्मिरी बोरांची बाग फुलविली. यातून त्यांनी गेल्या वर्षी तब्बल अडीच लाखांचे उत्पादन घेत शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला.