
राहुरी: राहुरी फॅक्टरी येथे रविवारी (ता. २९) एका लग्नात नवरदेवापुढे नाचणाऱ्या तळीरामांनी तुफान राडा घातला. लग्नात विघ्न आणणाऱ्या त्या तळीरामांना वऱ्हाडींनी भर मंडपात बेदम चोप दिला. त्यात, सहाजण जखमी झाले. त्यांना थेट रुग्णवाहिकेतून दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले. या राड्यामुळे दुपारचा लग्नविधी सायंकाळी चार वाजता पार पडला. एका लग्नाच्या गोष्टीचा पडदा पडला.