esakal | आमदार लंकेंनी शब्द पाळला, बिनविरोध केलेल्या गावांना २५ लाखांची बक्षिसी

बोलून बातमी शोधा

Fund of Rs. 25 lakhs to Gram Panchayats for holding unopposed elections

आमदार लंकेंनी शब्द पाळला, बिनविरोध केलेल्या गावांना २५ लाखांची "बक्षिसी"

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पारनेर ः तालुक्यात गतवर्षी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. ग्रामपंचायत बिनविरोध केल्या तर गावाच्या विकास कामांसाठी २५ लाख रूपये देण्यात येतील, असे आश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिलं होते. त्या आश्वासनाची पूर्तता करीत लंके यांनी त्या गावांना सभामंडप, रस्ते ,सांस्कृतिक भवन, सुशोभिकरण आदी कामांसाठी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. ही "बक्षिसी" मिळाल्याने गावकरीही खूश आहेत.

तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या त्या वेळी आमदार लंके यांनी नागरीकांना बिनविरोध निवडणूका करण्याचे आवाहन करून बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी देण्याचे अश्‍वासनही दिले होते. या आवाहानास राज्यभर प्रसिद्धी मिळाली. मात्र, त्या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह तालुक्यातील विरोधकांनीही शंका उपस्थित करीत इतका मोठा निधी कोठून देणार अशी टीका केली होती.

लंके यांच्या आवाहनास प्रतिसाद देत हंगे, शिरापूर, रांधे, कारेगांव, वेसदरे, पिंप्री पठार, जाधववाडी, भोयरे गांगर्डा व पळसपूर यासह नगर तालुक्यातील अकोळनेर ग्रामपंचायतीही बिनविरोध झाली होती. लंके समर्थकांच्या म्हणण्यानुसार अनेक गावात केवळ विरोधकांनी खोडा घातल्याने एका जागेसाठी निवडणुका झाल्या.

हेही वाचा: ह्रदयद्रावक ः दोन्ही मुले नाही आली, तहसीलदारांनीच दिला अग्निडाग

बिनविरोध निवडणुका झालेल्या गावांना २५ लाखाचा निधी विविध विकास कामांसाठी मंजूर केला आहे. तो पुढील प्रमाणे, (कंसातील आकडे मंजूर रक्कम ) पाबळ तळेवाडी ते पांढरकरवस्ती रस्ता ( १५ लाख) , जवळा ते गाडीलगांव रस्ता (२५ लाख ) पळसपूर येथे स्मशानभूमी सुशोभीकरण ( २५ लाख ), शिरापूर येथे उचाळे वस्ती शिरापूर रस्ता ( २५ लाख ), हंगे येथे सामाजिक सभागृह (५० लाख ), भोयरे गांगर्डा येथे गजाबाई मुक्ताबाई मंदीर सुशोभिकरण ( २५ लाख ), कारेगांव चारंगेश्‍वर मंदीर सभागृह ( १५ लाख ) व मुक्ताबाई मंदीर सुशोभिकरण (१० लाख ) , पिंप्रीपठार भैरवनाथ मंदीर सभामंडप ( २५ लाख ), वेसदरे सांस्कृतीक भवन (२५ लाख) , जाधववाडी स्मशानभुमी व प्रवेश द्वार (२५ लाख ) , रांधे सभामंडप व मज्जीद सुशोभिकरण (२५ लाख ).

देवसवडे येथे टेकडवाडी ते काळेवाडी घाट ( २५ लाख ), राळेगणथेरपाळ येथे डोमेवस्ती ते खंडोबावस्ती रस्ता (१५ लाख ), कडूस येथे वाघाजाई मंदीर सभामंडप (पाच लाख ) नांदूरपठार येथे श्रीकृष्ण मंदीर सुशोभिकरण (पाच लाख ) बाबुर्डी बेंद (ता. नगर गावठाण ते शिवरस्ता (२५ लाख ), पिंप्रीघुमट ते हंडेवस्ती रस्ता (२० लाख ) , आकोळनेर गावांतर्गत काँक्रीटीकरण (१० लाख ), देउळगांव सिद्धी सांस्कृतिक सभागृह ( ५० लाख ) ,बाबुर्डी घुमट रस्ता (२० लाख ) , हिंगणगांव कुरणमळा रस्ता (२५ लाख) .

मी वाचाळवीर नाही

मी दिलेला शब्द पाळणारा आहे. केवळ वाचाळवीर नाही. ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करा, तुमच्या गावाला २५ लाखांचा निधी देतो, असं आवाहन मी केले होते. काही गावांनी प्रतिसादही दिला. मात्र, काही गावात राजकीय हेतूने खोडा घातला गेला. ज्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या त्यांना निधी देऊन मी वचनपूर्ती केली.

- नीलेश लंके, आमदार.