
नगर जिल्हा परिषदेने 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत विभागाकडील योजनांवर निधी खर्च करण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे मंजुरी मागितली होती.
अहमदनगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत विभागासाठी 11 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातून प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन 45 रुग्णवाहिका खरेदी करण्यात येतील, असे आदेश ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रवीण जैन यांनी पुण्यातील राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाच्या राज्य प्रकल्प व्यवस्थापन संचालकांना दिला आहे.
अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नगर जिल्हा परिषदेने 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत विभागाकडील योजनांवर निधी खर्च करण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे मंजुरी मागितली होती. त्यानुसार ग्रामविकास विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन 45 रुग्णवाहिका खरेदीस परवानगी दिली. त्यासाठी पाच कोटी 85 लाख रुपये खर्च करता येतील. एक रुग्णवाहिका 13 लाख रुपयांची असेल.
हे ही वाचा : नगर- पुणे महामार्गाने प्रवास करताय ? वाचा, महत्त्वाची बातमी
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांना अर्सेनिक अल्बम-30 औषधवाटपाचा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार, नगर जिल्हा परिषदेला एक कोटी 48 लाख 68 हजार 520 रुपये देण्याबाबत राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान कार्यालयाला कळविले आहे.
संपादन : सुस्मिता वडतिले