esakal | अलिकडे ये मला पलिकडे ने, नदी भरली गोदावरी
sakal

बोलून बातमी शोधा

गोदेगावकरांसाठी गडाखांनी दिली बोट

अलिकडे ये, मला पलिकडे ने... नदी भरली गंगा

sakal_logo
By
प्रा. सुनील गर्जे

नेवासे : गोदाकाठावरील गोधेगाव (ता. नेवासे) येथील नागरिकांना मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांनी दिलेला शब्द पाळत गोदावरी पात्रातून प्रवासाला एक बोट उपलब्ध करून दिली.

नेवासे तालुक्‍यातील गोधेगाव हे गोदावरी नदीपत्रालगत असलेले व सद्गुरू किसनगिरी महाराज यांचे जन्मस्थळगाव. श्रीक्षेत्र देवगड व गोधेगाव हे दोन्ही गावांच्या मधून बारामाही वाहणारी गोदावरी नदी आहे. गोधेगावकर व देवगड येथील नागरिकांना दैनंदिन कामासाठी एकमेकांच्या गावात ये-जा करावी लागती.

हेही वाचा: थोरात कारखान्याने थेट तैवानहून आणला अॉक्सीजन प्लँट

यात विद्यार्थ्यांसह भविकांचाही समावेश असतो. मात्र, पत्रातून ये-जा करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने येथील नागरिकांना हाकेच्या आंतरावर जाण्यासाठी दहा-बारा किलोमीटर लांबच्या अंतराने जावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा वाया जातो. प्रशांत गडाख यांनी गोधेगाव येथे भेट दिली होती.

त्यावेळी ग्रामस्थांनी गोधेगाव ते देवगड या नदीपात्रातील प्रवासासाठी बोट मिळावी अशी मागणी केली होती. त्यानुसार राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांनी गोधेगावकरांना दिलेल्या आश्वासनपूर्ती करत जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी जिल्हा परिषद सेस निधीतुन गोधेगाव ग्रामस्थांना चौदा लाखांची बोट उपलब्ध करून दिली.

ही बोट मुळा'चे संचालक बाळासाहेब पाटील, संदीप सुडके यांच्यासह परिसरातील प्रतिनिधींच्या उपस्थित संत किसनगिरी महाराजांच्या मंदिर परिसराच्या ग्रामस्थांकडे सुपूर्त करण्यात आली.

loading image
go to top