
डॉ. शोभा आरोळे आणि रवी आरोळे ही भावंड जामखेडकरांसाठी देवदूत ठरताहेत. त्यांच्या कार्याचा गौरवही होतोय.समाजातून मदतीचा हातही मिळतोय.
जामखेड : कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतःला वाहून घेतलेल्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. शोभा आरोळे आणि रवी आरोळे या देवदुतांचा सोनेगाव येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते नीलेश गायवळ आणि पुणे बास्केटबॉल आसोशिएशनचे अध्यक्ष प्रा.सचिन गायवळ यांनी साडेतीन लाखांची औषधे देऊन 'गौरव' केला.या अनोख्या सन्मानाने आरोळे भावंडही भारावून गेले.
जामखेड येथे रँमन मँगसेस पुरस्कार विजेते स्वर्गीय डॉ. रजनीकांत आरोळे स्वर्गीय डॉ. मेबल आरोळे यांनी पन्नास वर्षापूर्वी सामाजिक बांधिलकीतून लावलेले ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे सुविधा केंद्र जामखेडकरांसह चार जिल्ह्याला नागरिकांना आधारवड ठरलंय. त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांचे नाव सार्थ ठरेल असेच काम या अपत्ती प्रसंगी केलय.
हेही वाचा -पीपीई कीट घालून अकोल्यात झाली चोरी
डॉ. शोभा आरोळे आणि रवी आरोळे ही भावंड जामखेडकरांसाठी देवदूत ठरताहेत. त्यांच्या कार्याचा गौरवही होतोय.समाजातून मदतीचा हातही मिळतोय.
नुकतेच सोनेगाव येथील गायवळ बंधुंनी केलाला अनोखा सन्मान समाजातील अन्य दात्रत्वसंपन्न व्यक्तींना प्रेरणा देणारा ठरतो आहे. निमित्त होते खासदार शरद पवारांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे. यानिमित्ताने गायवळ बंधूंनी सहकार्यांना बरोबर घेऊन ग्रामीण आरोग्य प्रकल्पाला भेट दिली. आरोळे भावंडांशी संवाद साधला आणि तब्बल साडे तीन लाखांची कोरोनाच्या उपचारासाठी उपयुक्त ठरणारी औषधे त्यांनी भेट देऊन त्यांनी सुरू केलेल्या या उक्रमाचा सन्मान केला.
ग्रामीण आरोग्य प्रकल्पातून कोरोना वर उपचार घेऊन २४०० पेक्ष्या ज्यास्त रुग्ण घरी गेले आहेत. डॉ .शोभा आरोळे आणि व्यावसायाने स्थापत्य अभियंता असलेले त्यांचे बंधू रवी आरोळे यांच्या सामाजिक कार्याची दखल समाजाच्या विविध स्तरातून घेतली जात आहे. त्यांनी सुरु केलेल्या आरोग्य सेवेचा नंदादीप सतत तेवत राहावा; यासाठी समाजातील दात्रत्वसंपन्न व्यक्तींकडून मदती ओघ सुरू आहे.
सोनेगाव येथील रहिवासी आणि पुणे जिल्हा बास्केटबॉल असोशिएशनचे सचिव प्रा. सचिन गायवळ यांच्याकडून खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जामखेड येथील आरोळे हॉस्पिटलमध्ये ३.५लाख रुपयांचे औषधांचा पुरवठा करण्यात आला.
गायवळ बंधूंनी लॉकडाऊनच्या काळातही केली होती मदत
सामाजिक कार्यकर्ते नीलेश गायवळ आणि प्रा.सचिन गायवळ या दोघा गायवळ बंधूंनी कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझरचे मशीन, पिण्याचा पाण्याचा पुरवठा, धान्य वाटप करुन मोठी मदत यापूर्वी केली होती. यावेळी कोरोनाच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात औषधांची पुरवठा करुन दाखविलेले दात्रत्व जामगेडकरांना मोठा आधार देणारे ठरेल हे मात्र निश्चित !
भावंडांच्या कार्याला सलाम
ग्रामीण भागात डॉ,शोभा आरोळे आणि रवी आरोळे या भावंडांनी जामखेड तालुक्यातील कोरोना पिडीतांची केलेली मोफत सेवा जामखेड कोरोना पॅटर्न राज्यात सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांच्या कार्याचा सन्मान शब्दात व्यक्त करणे सोपे नाही. दोन्ही भावंडाच्या कार्याला सलाम!
संपादन - अशोक निंबाळकर