esakal | पीपीई किटसारखा पोषाख परीधान करत चोरट्यांनी फोडली मोबाईल शॅापी
sakal

बोलून बातमी शोधा

Mobile shoplifting in Akole taluka

अकोले शहरातील हॉटेल जय महाराष्ट्रच्या मागे असलेले मातोश्री काँप्लेक्समधील स्टार मोबाईल शॉपीचे शटर तोडून तीन चोरट्यांनी महागड्या कंपनीचे तिन ते चार लाख रूपयांचे मोबाईल चोरून पोबारा केला आहे.

पीपीई किटसारखा पोषाख परीधान करत चोरट्यांनी फोडली मोबाईल शॅापी

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : अकोले शहरातील हॉटेल जय महाराष्ट्रच्या मागे असलेले मातोश्री काँप्लेक्समधील स्टार मोबाईल शॉपीचे शटर तोडून तीन चोरट्यांनी महागड्या कंपनीचे तिन ते चार लाख रूपयांचे मोबाईल चोरून पोबारा केला आहे.

विशेष म्हणजे सदर चोरट्यांनी पीपीई किटसारखा संपूर्ण शरीर झाकलेला पोषाख परीधान केलेला होता. त्यामुळे नव्याने बदलून आलेले पी. आय. परमार यांना जणू सलामी देऊन जबाबदारी वाढवली असल्याचे जनतेचे मत आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कोल्हार- घोटी राज्य मार्गालगत असलेल्या हॅाटेल जय महाराष्ट्रच्या पाठीमागे असलेले समिर सय्यद यांचे स्टार मोबाईल हे दुकानात बुधवारी मध्यरात्री ०२ वाजुन २७ मिनिटांच्या दरम्यान चोरट्यांनी फोडले आहे. यावेळी चोरट्यानी दुकानाचे शटरचे लॅाक तोडून दुकानात प्रवेश करत तीन ते चार लाख रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी गोणीत भरून नेली. तसेच दुकानातील वस्तूंची तोडफोड केली आहे. सदर चोरीचा सर्व प्रकार दुकानात असलेल्या सीसीटीव्हीच्या शुटींगमध्ये आला आहे. यामध्ये तीन चोर करताना दिसत असुन त्यांनी चक्क पीपीई किट सारखा पांढरा रंगाचा पोषाख परीधान केलेला आहे.

सदर घटना ही सकाळी या मातोश्री कॅाम्पलेक्सचे मालक दत्ता धुमाळ हे घरा बाहेर आले असता त्याना दुकानाचे शटरचे लॅाक तुटलेले निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ दुकान मालक समिर सय्यद यांना फोनवर माहीती दिली. त्यानंतर समिर सय्यद यांनी प्रत्यक्ष पाहुन अकोले पोलिसात तक्रार देताच अकोले पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी पथकासह घटनास्थळी जाउन पंचनामा केला आहे.

हेही वाचा : तीन माजी अध्यक्षांसह विद्यमान अध्यक्षांचे 'शनैश्वर' विश्वस्तपदासाठी गुडघ्याला बाशिंग
सदर चोरीच्या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये सर्व प्रकार दिसत आहे. माञ चोरी करताना कोविड संकटातील वापरली जाणाऱ्या पीपीई किटचा वापर करुन चोरट्यानी आपली ओळख लपवत पोलिसांना आव्हानच एक प्रकारे दिले आहे.

अकोले पोलिसांच्या रात्रीच्या वेळेत गस्त सुरु असतात तरीही आशा चोऱ्या शहरात सुरु आहे. व्यापाऱ्यानी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत तसेच बॅकेच्या एटीएमला ही कॅमेरे आहेत. माञ अनेक ठिकाणचे कॅमेरे हे बंद अवस्थेत आहे. शहरातील बॅकेची एटीएमवर कुठेही सुरक्षा रक्षक नाहीत. तर सीसीटीव्ही असतानाही त्यावर जुगाड उपाय करत चोरट्यांनी केलेली आजची ही चोरीची घटना व्यापाऱ्यांना धडकी भरवणारी आहे. सदर चोरीचा तपास लावून अकोले पोलिसांनी व्यापा-यांना दिलासा द्यावी, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image