

From Hard Work to Success: Ganesh Bongane Secures Class-2 Post Through MPSC
Sakal
सोनई : शेतात मशागत, पेरणी, खुरपणी आणि दर्जेदार पिकासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या हाताने महाराष्ट्र टायपिंग अॅण्ड शॉर्टहॅण्डमध्ये हाताच्या बोटाने क्रांती घडविली आणि शेतात राबणाऱ्या हाताने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. परीक्षेच्या निम्नश्रेणीत यश संपादन करीत गणेश अंबादास बोंगाणे याची मुंबईतील मंत्रालयात लघुलेखक क्लास-२ अधिकारी म्हणून निवड झाली. वर्षभरात सहा पदांवर उत्तीर्ण होणाऱ्या काळ्या मातीतील ध्येयवेड्या युवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.