नेवाशात बाप्पाला निरोप, पर्यावरणही राखले अन परंपराही

Ganesha immersion in Nevasa
Ganesha immersion in Nevasa

नेवासे  : गणपतीला मिरवुया, कोरोनाला हरवुया', 'बाप्पाला नमस्कार, कोरोनाला कर हद्दपार', 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' असे साकडे घालत नेवासे शहर व तालुक्यातील गणेश भाविकांनी आपल्या लाडके दैवत गणपतीला भावपूर्ण निरोप दिला.      

तालुक्यात सार्वजनिकसह हजारो घरगुती गणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जित केले. दरवर्षी मिरवणुकीने वाजत गाजत आणि सामुदायिकपणे गणेशाचे विसर्जन केले जाते. मात्र, यावर्षी ही परंपरा खंडित झाली आहे. 

तालुका प्रशासनाच्या व शहरात नगर पंचायतच्या घरगुती गणेशोत्सवामध्ये मूर्तीचे विसर्जन आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. नेवासे शहरातील तेरा सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तींची येथील गणपती घाटावर  पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या हस्ते व  उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सतीश पिंपळे, मुख्याधिकारी समीर शेख, राजेंद्र मापारी, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष नीरज नांगरे, इम्रान दारुवाला, पवन गरुड यांच्या उपस्थित आरती करून 'श्री'चे  विसर्जन करण्यात आले.       

तहसीलदार रुपेश सुराणा यांच्या हस्ते प्रवरसंगम घाट येथे आरती करण्यात आली. तालुक्यातील  93  सार्वजनिकसह हजारो घरगुती  गणेशमूर्तीचे  पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आले. नेवासे शहरात दोन ट्रॉली निर्माल्य दान केले. नेवासे नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी सकाळ पासूनच विसर्जनाची पर्यायी व्यवस्था म्हणून प्रभागामध्ये विविध ठिकाणी गणेशमूर्तींचे संकलन करत  होते.

यंदा ध्वनी प्रदूषणला मुक्ती  
 कोरोनामुळे यंदा गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे विद्युत रोषणाई नाही, कर्कश वाद्ये,  ढोल, ताशा, डॉल्बी हे वाद्य व  फटाक्यांच्या आतषबाजीला फाटा देण्यात आल्याने. यंदा तरी ध्वनिप्रदूषणला मुक्ती मिळाली.

संपादन - अशोक निंबाळकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com